Home »Maharashtra »Pune» Ministers Stylish Doughter Married Ips Singham Shivdeep Lande

मंत्र्यांच्या या स्टायलिश मुलीने केले दबंग, डॅशिंग IPS सोबत लग्न, पाहा फोटोज...

शिपदीप लांडे हे मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

दिव्यमराठी वेब टीम | Oct 09, 2017, 08:14 AM IST

  • मंत्री विजय शिवतारेंची मुलगी ममता हिचा विवाह IPS शिवदीप लांडे यांच्याशी झाला आहे.
पुणे- बिहार पोलिस दलात दबंग, सिंघम, डॅशिंग IPS अशी ओळख मिळवून तरूणाईत कमालीचे लोकप्रिय झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिपदीप लांडे यांना गेल्या वर्षी महाराष्ट्र केडर दिले गेले. लांडे यांना महाराष्ट्रात तीन वर्षासाठी पाठवले आहे. सध्या ते मुंबईतील अॅंटी नार्कोटिक सेल (ANC) विभागात कार्यरत आहेत. शिपदीप लांडे हे मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. पुण्यातील पुरंदरचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह तीन वर्षापूर्वी शिवदीप यांच्यासमवेत झाला.मंत्र्यांच्या स्टायलिश मुलीशी केला विवाह.....
- पुण्यातील पुरंदरचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह दोन वर्षापूर्वी बिहार पोलिस दलात कार्यरत असलेले व दबंग, सिंघम अशी ख्याती मिळवलेले विदर्भीय पुत्र आयपीएस शिवदीप लांडे यांच्याशी झाला.
- ममता लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. ममताचे बालपण साधारण व मुंबईतील चाळीत गेले असले तरी पुढे शिवतारे यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली व आपली आर्थिक प्रगती केली.
- पुढे शरद पवारांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला मात्र राष्ट्रवादीत काही राहिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- शिवसेनेत गेल्यावर ते आमदार झाले व आता मंत्रीही बनले आहेत. शिवतारे यांना दोन मुले व एक मुलगी आहे.
- दोन्ही मुले बांधकाम व्यवसायत आहेत. तर, मुलगी ममताने आयपीएस शिवदीप लांडे यांच्याशी विवाह केला.
- बिहार पोलिस दलात कार्यरत राहिलेले शिपदीप यांनी आपले सासरे मंत्री शिवतारे यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र पोलिस दलात रूजू होण्याबाबत केंद्रीय व राज्याच्या गृहमंत्रालयाकडे अर्ज केला होता.
- त्यानंतर शिवतारे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शब्द टाकला. अखेर शिवदीप लांडे यांना गेल्या वर्षी तीन वर्षासाठी महाराष्ट्र पोलिस दलाचे केडर मिळाले.
मुंबईत जुळली होती मने-
- शिवदीप लांडे बिहारात जबरदस्त कामगिरी करत होते. त्यामुळे इकडे आपल्या महाराष्ट्रातही लांडे यांच्या पराक्रमाच्या बातम्या झळकत होत्या. त्यामुळे मराठी तरूणीही लांडे यांच्या व्यक्तीमत्त्वावर भाळल्या होत्या.
- इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी व यूपीएससी करण्यासाठी लांडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांचे फ्रेंड सर्कल मोठे आहे.
- त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत लांडे मुंबईत येत असत. तेथेच शिपदीपची शिवतारे यांची कन्या ममता हिची ओळख झाली.
- मैत्री झाल्यानंतर शिवदीप व ममताने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- 2 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांचा विवाह मुंबईत पार पडला. आता या दोघांच्या संसारात एका चिमुकलीने आगमन केले आहे.
नितीश, लालू-पासवान या त्रिकुटानेही केले कौतूक-
- आपल्या दबंग कामगिरीमुळे शिवदीप हे बिहारमधील युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनले होते.
- यादरम्यान, दबंग, सिंघम अशी ओळख निर्माण केली. तरूण-तरूणी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ताटकळायचे.
- त्यांच्या दबंगगिरीने गुन्हेगारी जगताला सळो की पळो करून सोडले. त्याची दखल घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लांडे यांना पाटण्याचे पोलिस अधीक्षक बनविले होते.
- त्यानंतर लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या. त्यांच्याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली.
- लांडे याच्या या कामगिरीचे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही जाहीर सभांमधून कौतुक केले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मंत्र्यांची मुलगी व आयपीएसची पत्नी असलेल्या स्टायलिश ममताचे निवडक फोटोज...

Next Article

Recommended