आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minor Accident At Baramati On Going Dahihandi Ustav

बारामतीत दहीहंडी उत्सवाच्या वेळी खांब कोसळल्याने दोन गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- बारामती येथे आज सकाळी दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या विद्यूत रोषणाईचा लोखंडी खांब कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात एका लहान मुलीचा समावेश आहे. बारामतीतीस दहीहंडी पथके पुणे-मुंबईत दहीहंडी फोडण्यासाठी जातात त्यामुळे ते दुस-या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करतात. स्वर्गीय धनंजय देशमुख मेमोरियल ट्रस्टतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
बारामतीतील नगरपरिषदेच्या मुख्य चौकात दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. हा चौक शहरातील मुख्य चौक असल्याने या चौकात इतर चार-पाच दहीहंडीचे आयोजन केले जाते. यामुळे या चौकात डीजेचा नुसता दणदणात असतो. या ट्रस्टकडून उभारण्यात आलेल्या डीजे सेटजवळच विद्यूत रोषणाईचा खांब उभारण्यात आला होता. आज सकाळी डीजेचा फुल्ल आवाज सोडण्यात आला होता. त्यावेळी आसपासचा परिसर हादरून जात होता. त्याचवेळी विद्यूत रोषणाईसाठी उभारण्यात आलेली लोखंडी रॉड कोसळला. त्यावेळी एक मुलगा आणि गाडीवरून वडिलांसमवेत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.