आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अल्पवयीन मुलाने 9 दुचाकी जाळल्या; आई-वडील रागवल्याने कृत्य केल्याचे उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आई-वडील रागवल्याने अल्पवयीन मुलाने 9 दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेस्टर्न इंडिया सोसायटीत हा प्रकार घडला आहे. 
 
आई-वडील ओरडल्यामुळे रात्री दोनच्या सुमारास मुलाने या दुचाकी पेटवल्या. इमारतीखाली फूटपाथ परिसरात या बाईक पार्क करण्यात आल्या होत्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या, मात्र तोपर्यंत 9 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
 
या प्रकरणी विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फूटेज तपासायला घेतले. त्यानंतर गाड्या जाळणाऱ्या मुलालाही ताब्यात घेण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...