आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अल्पवयीन मुलीने केली लग्नाच्या बेडीतून स्वत:ची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "सैराट' चित्रपटातील अार्चीच्या धाडसाची सर्वत्र चर्चा हाेत असतानाच, पुण्यातील बारावी झालेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबीयांचा विराेध डावलून स्वत:ची लग्नाच्या बेडीतून सुटका करून घेतली अाहे. लहान वयातच मनाविरुद्ध ठरलेले लग्न उजेडात अाणण्यासाठी तिला गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी तत्काळ मदत केल्याने तिचा विवाह टळला. अाता तिला पुढील शिक्षण घेता येणार अाहे.

सुरेखा (नाव बदलले अाहे) ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. वडील रिक्षाचालक तर अार्इ गृहिणी. मुलगी वयात अाल्याचे पाहताच दाेघांनी मिळुन नात्यातीलच भाडाेत्री वाहन चालवणाऱ्या एका तरुणाशी तिचे बळजबरीने लग्न ठरवले. मात्र, लग्न न करता शिक्षणाची अावड असल्याने पुढील शिक्षण घेता यावे याकरिता सुरेखाने लग्न न करण्याचे ठरवले. तिने त्याबाबत कुटुंबीयांना सांगितले. पण त्यांनी तिला विराेध केला. अखेर अाई वडिलांना कळू न देता तिने थेट गुन्हे शाखेच्या पाेलिसांना फाेन करून सविस्तर माहिती सांगितली. दुसऱ्याच िदवशी हाेणारा विवाह साेहळा राेखावा, अशी कळकळीची विनंती तिने केली. पाेलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ एक पथक मुलीच्या घरी पाठवून िदले. तेव्हा सुरेखाच्या घरी माेठ्या प्रमाणात नातेवाईक मंडळी जमा झाली असून हळदीचा कार्यक्रम सुरू होता. विवाहाची तयारीदेखील सुरू होती. ती पोलिसांनी आधी थांबवली.
पोलिस येताच टळला विवाह
पाेलिसांना घरी अालेले पाहताच सुरेखाच्या अार्इवडिलांसह नातेवाइकांची घाबरगुंडी उडाली. अखेर पाेलिसांनी सुरेखाच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले. सुरेखा अल्पवयीन असल्यामुळे तिचा विवाह केल्यास तुमच्यावरही कायदेशीर कडक कारवाई होऊ शकते, याची त्यांना जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर पालकांनी मुलीचा विवाह करणार नाही, असे लेखी लिहून दिले. त्याचबरोबर लग्न माेडल्यामुळे मुलीला काेणताही त्रास दिला जाणार नाही. सज्ञान झाल्यानंतर व शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तिचा विवाह केला जाईल, अशीही लेखी हमी अाई - वडिलांकडून पोलिसांनी घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...