आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - येथील एका १७ वर्षांच्या मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मनमाडच्या नगराध्यक्षांचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विनोद चंदनशिव, पिंटू पाटोळे, अनिल पाटील, नगराध्यक्ष योगेश पाटील
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगी संगणक क्लासला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिचे अपहरण करून चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पाेलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर मुलीला नाशिक न्यायदंडाधिका-यांसमोर उभे करण्यात आले. या वेळी तिने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे न्यायालयात सांगितले. दरम्यान, हे राजकीय षड्यंत्र असल्याचे निवेदन सर्वपक्षीय राजकीय पदाधिका-यांनी उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांना दिले आहे.