आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 82 दुचाकी, 4 कार जाळल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- औरंगाबाद, नाशिक या शहरांनंतर जळीतकांडाचे लोण आता शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातही पसरले आहे. सिंहगड रोडवरील सनसिटी भागात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात लोकांनी तब्बल 82 दुचाकी आणि 4 कारला आग लावली. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचे स्केच जारी केले आहे.
सिंहगड रोडवरील डॉमिनोज पिझ्झा दुकानासमोरच्या डीलीव्हरी बॉइजच्या 29 दुचाकी जाळण्यात आल्या. निर्मल टाऊनशिप, सुर्यनगरी, सनसिटी येथील सुमारे 15 दुचाकी, स्वामीनारायण सोसायटीमधील 20 दुचाकी, अक्षय ग्लोरी सोसायटीतील 8 दुचाकी आणि अवधूत सोसायटीतील 10 दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यानी मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
पुण्यात या पूर्वीही गाड्या जाळण्याचे प्रकार उघडकीस आले होते. पण एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच गाड्या जाळण्यात आल्या आहेत. शिवाय सिंहगड रोड सारख्या परिसरात अशी घटना घडल्याने लोकांना मोठा धक्का बसला आहे. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या जळीत कांडात अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. त्या आता पुन्हा वापरता येतील याची जराही शक्यता नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या जळीतकांडाचे फोटो... अशा जाळण्यात आल्याय गाड्या...