आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकंतीस निघालेले पुण्याच्या आयटी कंपनीतील चौघे बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आयटी कंपनीत काम करणारे तीन तरुण व एक तरुणी कर्नाटकात कारने फिरायला गेले होते. मात्र ते बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रणव अशोक लेले (वय 29), चिंतन बिच, साहिल कुरेशी व ऋतिका चंदनवाणी अशी या युवकांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री हे चौघे कोथरुड येथून कारने (एमएच 12 एफवाय 4510) निघाले. 30 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर मंगळवारपर्यंत त्यांचा संपर्क झालेला नाही. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाक्यावरून पहाटे दोनला त्यांचे वाहन पास झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
सदर बेपत्ता व्यक्तींचा कोथरुड पोलिस पुढील तपास करत असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.