आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

350 कोटींचा घोटाळा: आमदार रमेश कदमांच्या दोन बहिणी ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना ३५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रमेश कदम हे दोन दिवसांपासून फरार आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांची बहीण नकुशा गोविंद कदम (रा. तळजाई वसाहत, धनकवडी,पुणे) पुण्यातून तर लक्ष्मी महादू लाेखंडे यांना साेलापूरच्या पथकाने अकलूज येथून ताब्यात घेतले अाहे.

सीअायडीचे अतिरिक्त पाेलिस महासंचालक संजय कुमार यांनी या माहितीस दुजाेरा दिला अाहे. या दाेघींना दहिसर पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात तपासकामी ताब्यात घेण्यात अाल्याचे सांगण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...