आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Activists Attacks On Mapple Builders Office At Shivaji Nagar Pune

‘मॅपल’चा सचिन आग्रवाल पालकमंत्री बापटांसमोर पळाला, पोलिस बघ्याच्या भूमिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यात पाच लाखांत ‘आपलं घर' देण्याचे अामिष दाखवून हजाराे ग्राहकांना फसवणाऱ्या मॅपल कंपनीचे संचालक सचिन अशाेक अग्रवाल, नवीन अशाेक अग्रवाल, सेल्स मॅनेजर प्रियंका अग्रवाल व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर मंगळवारी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अाहे. पाेलिसांनीच पुढाकार घेत ही कारवाई केली. दरम्यान, तत्पूर्वी सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॅपल ग्रुपच्या कार्यालयाची ताेडफाेड करत तेथील गृहनाेंदणी बंद पाडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांची छायाचित्रे वापरून मॅपल ग्रुपने स्वस्तात घर मिळवून देण्याची जाहिरात केली हाेती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. हजाराे ग्राहकांकडून या कंपनीने नाेंदणी शुल्क म्हणून प्रत्येकी ११४५ रुपये परत न देण्याच्या अटीवर घेतले हाेते. मात्र, भाजपचे खासदार किरीट साेमय्या यांनी याविराेधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत मॅपल कंपनीच्या चाैकशीचे अादेश साेमवारीच मंत्रालयातून देण्यात अाले हाेते. तसेच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व पालकमंत्री गिरीश बापट यांनीही या बिल्डरला काेणतीही शासकीय याेजना राबवण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले हाेते. दरम्यान, शिवाजीनगर पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक नारायण मनाेहर पालमपल्ले यांनी याप्रकरणी ‘मॅपल’च्या संचालकांविराेधात फिर्याद दाखल केली. या कंपनीने वर्तमानपत्रात केलेली जाहिरात फसवी असल्याचे पत्र प्रधानमंत्री अावास याेजना या कार्यालयाचे मिशन डायरेक्टर निर्मल देशमुख यांनी पाेलिसांकडे दिले हाेते. तसेच सागर बाळकृष्ण अजबे, विशाल राजेंद्र अागरवाल यांचे जबाब यावरून कंपनीकडून सर्वसामान्यांची फसवणूक हाेत असल्याचे उघड झाल्यामुळे संचालकांवर कलम ४२०, ४१७, १२० ब, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात अाले.
कारवाईचे सरकारचे आदेश पण अद्याप कार्यवाही नाही
पुण्यासारख्या मेट्रो शहरात 5 लाखांत 1 बीएचके घर देऊ अशी खोटी जाहिरात देऊन, ही योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असल्याचे भासवून मॅपल ग्रुपने ग्राहकांना आकर्षित केले आहे. मात्र, ही सर्व बनावटगिरी असल्याचे उघड झाल्याने राज्य सरकारने मॅपल बिल्डर्सवर गुन्हेगारी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, या कंपनीवर अद्याप कोणतेही कारवाई झालेली नाही.
अग्रवाल फरार, बापटांवर अाराेप
गुन्हा दाखल हाेण्यापूर्वीच मॅपल कंपनीचा संचालक सचिन अग्रवाल फरार झाला अाहे. ‘पालकमंत्री गिरीश बापट हे दिवसभर अग्रवाल यास घेऊन बसले हाेते. गुन्हा दाखल हाेण्यापूर्वी त्याला फरार हाेण्यासाठी त्यांनीच मदत केली,’ असा अाराेप मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला. दरम्यान, बापट यांच्याविराेधात बुधवारी अांदाेलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तरीही नोंदणी करणा-यांच्या रांगा
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दोन दिवसापूर्वी मॅपल कंपनी ग्राहकांना फसवत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण मिडियाने उतलून धरले. त्यानुसार मॅपल कंपनीचा बदमाशपणा उघड झाला आहे. तरीही नेहमीप्रमाणे आज सकाळपासूनच मॅपलच्या विविध केंद्रांवर नव्याने घरांच्या नोंदणीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. तर काहीजण या प्रकल्पाची शहानिशा करीत आहेत.