आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात MNS चे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन; FC, JM, सिंहगड रोड, राजाराम पूलालगत राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजाराम पूल, विठ्ठलवाडी परिसरातील फेरीवाल्यांना मनसेने हुसकावून लावले आहे. - Divya Marathi
राजाराम पूल, विठ्ठलवाडी परिसरातील फेरीवाल्यांना मनसेने हुसकावून लावले आहे.
पुणे- मनसेने पुण्यात फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन केले आहे. सिंहगड रोडवरील फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटवले आहे. FC, JM, सिंहगड रोडवर व राजाराम पुलाजवळ असणाऱ्या फेरीवाल्यांना मनसैनिकांनी हुसकावून लावले आहे. 
 
जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला. सिंहगड रोड परिसरातही अनेक फळे आणि भाजीपाल्यांचे स्टॉल मनसेच्य कार्यकर्त्यांनी उधळून लावले. यामध्ये विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. त्यांचे स्टॉल तोडण्यात आले. सावलीसाठी लावण्यात आलेल्या छत्र्याही मोडून टाकण्यात आल्या.
 
राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट

फेरीवाल्यांप्रश्नी कोर्टाचे निर्देश पाळा, तसे झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार नाही, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. फेरीवाल्यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली. यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीने कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...