आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मनसैनिकांचा राडा, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे अडवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आजचे रास्ता रोको आंदोलन राज्यभर मोठया तीव्रतेने सुरू आहे. पुण्यातही रास्ता रोको आंदोलनाचे जोरदार पडसाद पडल्याचे दिसत आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून रास्ता रोकोला सुरुवात होणार होती. मात्र पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच या आंदोलनाला सुरवात केली होती.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंजवडीतील हायवे पूर्णपणे अडवला आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. याचबरोबर चांदणी चौकातही आंदोलकांनी ठाण मांडले आहे. चांदणी चौकातून पोलिसांनी मनसेच्या नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी चांदणी चौकात दगडफेक केली आहे. याचबरोबर खेड-शिवापूर टोलनाका खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला आहे. ऊर्से टोलनाक्यावर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करणा-या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एकूनच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागातील हजारो मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक केली आहे.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील मनसेचे रास्ता रोको...