आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Candidate Should Have Wait For Rape Till Election R R Patil

VIDEO: सुसंस्कृत आबांची जीभ घसरली, ऐन रणधुमाळीत केले वादग्रस्त वक्तव्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघात निवडणुकीला उभे असलेले आर आर पाटील यांनी कवठे-एकंद गावात प्रचाराच्या भाषणादरम्यान शुक्रवारी हे वादग्रस्त वक्तव्य केले. याच मतदारसंघातील मनसेचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असून ते तुरुंगात आहेत. त्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आबांना पाठिंबा दिला होता. त्याबाबतची माहिती देताना आबांचा तोल सुटला.
मनसेच्या उमेदवाराला आमदार व्हायचे होते तर त्याने निवडणुकीपर्यंत बलात्कार करायला नको होता असे आबांनी वक्तव्य केले. दरम्यान, याबाबतची माहिती आबांचे राजकीय विरोधक व सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना मिळताच त्यांनी आबांच्या भाषणाची क्लिप मिळवली व माध्यमांपर्यंत पोहचवली. त्यानंतर आज दिवसभर याबाबतची व्हिडिओ क्लिप वाहिन्यांवर दाखवली जात आहे.
या वक्तव्याबाबत आबांनी स्पष्टीकरण दिले असून, आपण महिलांबाबत वक्तव्य केले नसून, प्रतिस्पर्धी उमेदवारावर उपरोधिक टीका केली आहे. भाषणाच्या ओघात मी प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करताना हे बोललो आहे. मनसेचा उमेदवार हा गुन्हेगारी क्षेत्रातील आहे. त्याच्यावर यापूर्वीच बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तो गुन्हेगारी क्षेत्रातील असल्याने मी त्याच्यावर उपरोधिक टीका केली यातून महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही.
आबांनी हे वक्तव्य प्रतिस्पर्धी उमेदवारावर उपरोधिक टीका केली आहे. तसे आबा मान्य करीत असल्याने व त्याबाबत खेद व्यक्त केल्याने याचे राजकारण केले जाऊ नये असे शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात विरोधक असल्या काही बाबी पुढे आणत असतात. मात्र, तेथील खासदार संजयकाका पाटलांनी जशी ही क्लिप माध्यमांपर्यंत पोहचवली तशीच मदत अत्याचारी व पीडित महिलांनाही करावी असा टोला गो-हे यांनी संजयकाकांना हाणला.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आबांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमचा उमेदवार दोषी असेल तर त्याच्याविरोधात नियमानुसार कारवाई व्हावी. मात्र तो दोषी आहे की नाही लागलीच पुढे येणार नाही. निवडणुकीच्या काळात कोणीही त्याचे राजकारण करू नये.
पुढील स्लाईडवर बघा, आर. आर. पाटील या भाषणात काय म्हणाले....