आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझं कुळ आणि मूळ शिवसेनेच, सेनेचे महापौर झाल्यास आनंदच- बाळा नांदगावकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माझं कुळ आणि मूळ शिवसेनाच आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुंबईचा महापौर कोणत्याही पक्षाचा होवो पण, शाहू-फुले-आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारांचा असावा, अशीही अपेक्षा नांदगावकर यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत एमव्हीएमबाबतच्या खूप तक्रारी आहेत. यासंदर्भात चौकशी व्हावी, अशी मागणीही नांदगावकरांनी केली.

शिवसेनेला पाठिंब्याबाबत राज निर्णय घेतील... 
मुंबईत महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील. राज ठाकरे यांचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, असा विश्वास नांदगावकरांनी व्यक्त केला आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा...पुण्यातील वाडेश्वर कट्टा आणि खासदार संजय काकडे यांनी 4 हजार रुपयांचे बक्षीस

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


 
बातम्या आणखी आहेत...