आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मनसेला दणका, विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 40 (अ) साठी झालेल्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंदुमती फुलावरे यांचा त्यांनी 451 मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे काँग्रसला विरोधीपक्षनेतेपदावरही दावा सांगता येणार आहे.

मनसेच्या ताब्यात असलेल्या या प्रभागात काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्याने मनसेला मोठा फटका बसला आहे. पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आज (सोमावार) जाहीर झालेल्या पोटनिवडणूकीच्या निकालामुळे पालिकेतील संख्याबळात बदल झाला आहे. 29 जागांसह मनसेकडे विरोधीपक्षनेतेपद आहे. मात्र आता त्यांचे संख्याबळ 28 तर, काँग्रेसचे 29 झाले आहे. यामुळे सत्ताधारी काँग्रसचे नगरसेवक विरोधीपक्षनेतेपदावरही दावा सांगण्याची शक्यता आहे.

या पोटनिवडणूकीसाठी रविवारी 42.82 टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी मतदारांनी दाखवलेला निरुत्साह मनसेवरील नाराजी स्पष्ट करणारा ठरला आहे. या प्रभागातून याआधी मनसेच्या कल्पना बहिरट निवडूण आल्या होत्या. त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याने उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. काँग्रेसच्या या विजयामुळे पालिकेतील त्यांच्या संख्याबळात वाढ झाली आहे.


पुढील स्लाइडमध्ये,
भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, शिवसेनेच्या कोतवाल पराभूत