आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Mla Ram Kadam Joins Bjp In The Presence Of Amit Shah

मनसेचे आमदार राम कदमांचा पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- प्रकृती अस्वास्थ्यामुळे मराठवाड्यातील मुलाखती अर्धवट सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी तातडीने मुंबईला रवाना झाले होते. त्यांच्या प्रकृतीतील सुधारणेबद्दल अजून माहिती आली नसतानाच, मनसेची तब्येत बिघडवणारी बातमी आली आहे. घाटकोपरमधील मनसेचे आमदार राम कदम यांनी आज पुण्यात भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

पुणे भाजपने अमित शहांच्या उपस्थितीत ‘विराट विजय संकल्प मेळावा’ आयोजित केलेला होता. यावेळी वसंत वाणी, विजय कांबळे आदी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी मनसेत व राज ठाकरेंवर नाराज असलेल्या राम कदम यांनीही भाजपात प्रवेश केला. पुण्याचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य होणार असल्याच्या चर्चा आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आज सायंकाळी 7 वाजता हा मेळावा झाला.
राम कदम हे काही महिन्यांपासून राज ठाकरेंवर नाराज होते. राम कदम यांच्यावर काही प्रकरणांत गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेने बघ्याची भूमिका घेतल्याची त्यांची भावना झाली होती. त्यामुळे ते पक्षात सक्रिय नव्हते. दुसरीकडे, राम कदम भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दोन महिन्यांपासून सतत येत होत्या. मुंबईत काही दिवसांपूर्वीच त्यांचे पोस्टर झळकले होते त्यावर मनसे किंवा राज ठाकरे यांचा उल्लेख नव्हता. कदमांच्या भाजप प्रवेशाला खासदार पूनम महाजन यांचा विरोध होता. मात्र, विनोद तावडे आणि आशिष शेलार या जोडीने महाजन यांचा विरोध डावलून कदम यांच्यासाठी अमित शहांकडे शब्द टाकल्याचे कळते.
राज ठाकरेंचे मोदींशी आता संबंध पहिल्यासारखे राहिले नसल्याने अमित शहांनी कदम यांना प्रवेश देण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार कदम यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, भाजपच्या सभेचे छायाचित्र