आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Rasta Rokho Agaitation, Raj Thackeray At Vashi Naka

राज ठाकरेंना पोलिसांनी सोडताच मनसेचे \'रास्ता रोको\' स्थगित, उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 'रास्ता रोको' आंदोलन आज महाराष्ट्रभर सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंना चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अटक केली होती. राज ठाकरे यांच्यासमवेत शर्मिला ठाकरे, पुत्र अमित, आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनाही ताब्यात घेतले होते. राज ठाकरेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर शर्मिला ठाकरेंनी आरसीएफ पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. राज यांना अटक झाल्याचे कळताच मुंबईतील मनसेचे कार्यकर्ते व वाशी टोलनाक्यावर थांबलेले हजारो कार्यकर्ते आरसीएफ पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले होते. दरम्यान, राज ठाकरेंना अटक केली नसल्याचे सांगत प्रतिबंधक कारवाईचा भाग म्हणून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले होते. अखेर दोन तासांच्या नाट्यानंतर राज ठाकरेंना पोलिसांनी सोडून दिले. त्यानंतर राज ठाकरे थेट मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना थेट घरी जाण्याची अट घातली होती. त्यानुसार ते घरी पोहोचले. दरम्यान, या घडामोडींनतर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेने रास्ता रोको करण्याचे आवाहन करीत हे आंदोलन स्थगित केल्याचे सांगितले. उद्या सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेला बोलावले असल्याचे राज यांनी सांगितले.
आज सकाळपासून राज्यातील प्रमख शहरांत या आंदोलनाने पेट घेतला होता. मुंबई-पुणे-नाशिक या शहरांमध्ये आंदोलनाची तीव्रता जास्त होती. या शहरांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला दिसला. आंदोलनात मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते. सरकारनेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे मनसेचे आंदोलन शांततेत झाल्याचे दिसून आले.
मनसेचे आमदार बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांची आज सकाळी पोलिसांबरोबर बाचाबाची झाली होती. त्यानंतर आम्ही शांततेत आंदोलन करीत असून, तुम्हाला आमचे आंदोलन चिरडून काढायचे आहे का असे सवाल नांदगावकर यांनी पोलिसांना केला. त्यावर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते त्यामुळे आम्ही तुम्हाला मोकळे सोडू शकत नाही. बळाचा वापर करण्याची वेळ आणू देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना केले. त्यानंतर नांदगावकर, सरदेसाई यांच्यासह राज, पत्नी शर्मिला व पुत्र अमित यांना पोलिसांच्या गाडीत बसवून वाशीला घेऊन जाऊ असे सांगत गाडीत बसवले व थेट त्यांनी चेंबूरमधील आरसीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.
मुंबईतील आमदार प्रविण दरेकर, शिशिर शिंदे, नाशिकचे आमदार नितीन भोसले, सांगळे यांना पोलिसांनी अटक केली होती. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले होते की, बारावीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थी व पालकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसेच सामान्य जनतेला वेठीस धरू नका. तसेच रास्ता रोको आंदोलनामुळे ज्यांना त्रास होणार त्यांची माफी मागतो. मात्र आम्हाला अशा प्रकारचे आंदोलन करण्यावाचून पर्याय राहिला नसल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंसह आपण व आमचा मुलगा अमित वाशी टोलनाक्यावर आंदोलन करणार आहोत. यात आम्हाला अटक झाली तरी बेहत्तर असे शर्मिला ठाकरेंनी म्हटले होते.
पुढे पाहा, छायाचित्राच्या माध्यमातून मनसेचे रास्ता रोको आंदोलन....
राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन राजकीय भावनेतून प्रेरित आहे... की जनतेच्या कल्याणासाठी टोल बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे... आपली अमुल्य प्रतिक्रिया द्या....आमच्या फेसबुक पेजलाही भेट द्या.