आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Application For Election Booth Information News In Marathi

मतदान केंद्राचा शोध मोबाइलवर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात सध्या चर्चा आहे ती तरुणाईची आणि वाढत्या टेक्नोसॅव्ही नव्या मतदारांची. केंद्रीय निवडणूक आयोगानेही तरुणाईला मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी टेक्नो फंडा स्वीकारला आहे. त्यासाठी सी-डॅकच्या (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग) पुणे, नोएडा आणि मुंबईच्या टीमचे सहकार्य घेऊन इलेक्ट्रोल रोल सर्च हे नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

सी-डॅकचे महासंचालक रजत मुना यांनी या उपक्रमाची माहिती पत्रकारांना येथे दिली. देशातील 14 राज्यांत या सॉफ्टवेअरचा प्रत्यक्ष वापरही सुरू करण्यात आला असून येत्या आठवड्यात अन्य राज्यांतही त्याचा वापर सुरू केला जाणार आहे, असे मुना यांनी या वेळी बोलताना सांगितले.

मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या दिवशी, कुठे व कोणत्या मतदार केंद्रावर करायचे आहे, याची माहिती हे सॉफ्टवेअर देणार आहे. मोबाइलवर इंटरनेट वापरणार्‍या कुठल्याही व्यक्तीला हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. याशिवाय एसएमएसद्वारेही या विषयीची माहिती मिळू शकणार आहे, असे मुना यांनी स्पष्ट केले.

एक महिन्यात काम पूर्ण
तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने आमच्याकडे अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरची मागणी केली होती. कामाचे स्वरूप व्यापक होते, पण एक महिन्याच्या अवधीत आम्ही हे काम पूर्ण केले. - रजत मुना, महासंचालक, सी-डॅक, पुणे.

- सी-डॅकच्या नोएडा टीमने राष्ट्रीय स्तरावर डाटा जमवणे, पडताळणे व तो डाटा सॉफ्टवेअरमध्ये बसवण्याचे काम केले.
- मुंबई टीमने मोबाइल अ‍ॅप आणि एसएमएस सेवा डिझाइन व विकसनाचे काम केले.
- पुणे टीमने नोएडा व मुंबई टीमने केलेल्या कामाचे एकत्रीकरण करून अंतिम उत्पादनाचे स्वरूप दिले.