आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हिंदुस्तान अँटिबायोटिक्स'ची मोक्याची 60 एकर जमिन विकण्यास केंद्र सरकारची मान्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) या सरकारी कंपनीतील उत्पादन पूर्ववत करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन चुकते करण्यासाठी संस्थेची जमीन विकून पैसा उभारला जाणार आहे. कंपनीची एकूण 60 एकर जमीन विकण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय खते रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे दिली.

कंपनीची पिंपरी येथे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी तब्बल 60 एकर जमीन आहे. मात्र, ही जमीन सरकारी कंपन्यांना विकण्यात येईल, अशी अट असल्याचेही अहिर यांनी स्पष्ट केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कंपनीचे गेल्या वर्षभरापासून ठप्प झालेले उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय एचए कंपनीला सरकारकडून 174 कोटींचे कर्ज दिले जाईल. कंपनीची नेहरूनगर येथील एकर जागा म्हाडाला विकण्यात आली आहे. आता उर्वरित 60 एकर जागाही विकण्यात येणार आहे.
सरकारी महामंडळ किंवा कंपनीलाच जमीन विकता येणार आहे. कामगारांचे पगार, ऐच्छिक सेवानिवृत्ती यासाठी प्राधान्यक्रमाने खर्च केला जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम (सुमारे 45 कोटी) खेळते भांडवल म्हणून वापरली जाईल. कर्मचाऱ्यांचे 11 महिन्यांपासूनचे थकीत वेतन भागवण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या दोन दिवसांत प्रत्येकाचा किमान तीन महिन्यांचा पगार दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...