आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या विकासासाठी मोदींनी पंतप्रधान व्हावे- मुंडेंची स्तुतिसुमने; मोदींचे मौन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अलीकडेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीही पुण्यातील एका कार्यक्रमात ‘मोदींनीच देशाची सूत्रे घ्यावीत’ असा जोरदार आग्रह धरला. यावरून मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे संकेत मिळाले. तर मोदी यांनी मात्र आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान पदाबाबत अवाक्षरही उच्चारले नाहील हे विशेष.
भाजपचा ‘थिंक टँक’ मानल्या जाणाºया रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्ती उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी उपस्थित होते. प्रबोधिनीचे अध्यक्ष मुंडे यांनी या वेळी ‘विकासपुरुष’ मोदी हेच पंतप्रधान पदाचे लायक उमेदवार असल्याचे जाहीर केले. मुंडे म्हणाले की, गुजरातने स्वातंत्र्यापूर्वी देशाला ‘लोहपुरुष’ वल्लभभाई पटेल आणि स्वातंत्र्यानंतर ‘विकासपुरुष’ मोदी असे दोन नेते दिले. मोदींनी गुजरातचा विकास ज्या समर्थपणे केला तसाच देशाचाही विकास त्यांनी करावा असे मला वाटते. गुजरातमध्ये विकासाचे मॉडेल त्यांनी यशस्वी करून दाखवले. देशाची आर्थिक व राजकीय व्यवस्था आज बिघडली असल्याने मोदींनीच आता देशाच्या विकासाचे मॉडेल यशस्वी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘आज स्वराज्य नव्हे तर सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ ही तरुण पिढीची अपेक्षा आहे. उद्याचा भारत तुम्हीच घडवावा ही लोकांची भावना तुमच्यापर्यंत पोचवत आहे. मोदी म्हणजे गुंतवणूक, मोदी म्हणजे व्यापार, मोदी म्हणजे विकास, अशी स्तुतीही मुंडे यांनी केली.
तुमच्या आशीर्वादानेच स्वप्न पूर्ण होईल : मोदी- प्रबोधिनीच्या कार्यक्रमापूर्वी नरेंद्र मोदी हे संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते. या ठिकाणी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर म्हणाले, ‘‘मोदी पंतप्रधान व्हायला हवेत. मोदींसारखी व्यक्ती पंतप्रधान झाल्यास सुधारणा होईल.’’ तर पं. गाडगीळ यांनी मोदी पंतप्रधान झाल्यास देश जगद् गुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर मोदींनी उत्त्तर दिले, ‘‘तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असतील, तुमच्या इच्छेत दम असेल तर गाडगीळांचे स्वप्न पूर्ण होईल.’’
‘प्रामाणिक प्रयत्नांतूनच विकास’
पुणे - परिस्थितीचे रडगाणे गात न बसता प्रामाणिक प्रयत्न केले तर विकास घडवता येतो. छत्रपती शिवाजी महाराज याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. गुजरातच्या जनतेनेच विकासाचे आंदोलन उभारल्याने गुजरात बदलला, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
‘सुशासन ही सूत्र है’ या विषयावरील व्याख्यानात मोदी बोलत होते. देशात सध्या घोर निराशेचे वातावरण आहे. मागच्या जन्मीचे पाप म्हणून येथे जन्माला आलो, अशीच भावना बहुसंख्य जनता व्यक्त करीत आहे. परंतु, निराश होण्याचे कारण नाही. प्राप्त परिस्थितीतही देशाचे चित्र बदलता येईल, हे गुजरातच्या अनुभवावरून मी सांगतो. शिवाजी महाराजांनी संघर्षाच्या काळातच महान प्रशासकाचे उदाहरण घालून दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक आत्महत्या करतात. गुजरातचा कापूस उत्पादक चीनला निर्यात करतो. गेल्या दशकात गुजरातचे दुध उत्पादन साठ पटीने वाढले. देशाची भूजल पातळी घटत असताना आमच्याकडच्या भूजल पातळीत वाढ होत आहे. गुजरातचा मुख्यमंत्रीच नाही तर प्रत्येक गुजराती विकासाची भाषा बोलतो. देशातही सुराज्य शक्य आहे. बदल घडू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी आत्महत्या म्हणजे सरकारच्या धोरणाचे बळी- गोपीनाथ मुंडे