आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींविरुद्ध धारियांनी पुकारले होते बंड, नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी जेष्ठ समाजसेवक मोहन धारियांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी धारिया यांच्या निधनाबद्दल टि्वट करीत शोक व्यक्त केला आहे. मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, धारिया एक समर्पित व ध्येयवादी नेते व समाजसेवक होते ज्यांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. दरम्यान, काँग्रेसचे नेते असूनही , दिल्लीतील नेत्यांनी धारिया यांना श्रद्धांजली वाहिली नसून, मोदींनी मात्र आपले काम निभावले आहे.
काँग्रेस नेते असूनही धारियांनी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णया विरोधात जाहीर भाष्य करणा-या मोहन धारियांनी पुढे समाजसेवेला वाहून घेतल्यामुळे मोदी त्यांचे चांगलेच प्रशंसक झाले होते. त्यामुळे आज धारिया यांचे निधन होताच मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

आणखी पुढे वाचा मोदी आणि धारियांबाबत.....