आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Will Meet Nationalist Congress Chief Sharad Pawar At Baramati

चाचा-भतीजावर टीका करणारे मोदी अखेर पवारांच्या गळाला, ‘व्हॅलेंटाइन डे’ला पाहुणचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पवार ‘चाचा-भतीजां'ची गुलामी मोडून काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारच महिन्यांपूर्वी थेट बारामतीत येऊन केले होते. तेच मोदी ‘व्हॅलेंटाइन डे’ला त्याच बारामतीमध्ये येऊन त्याच शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. तेही पवारांच्या निमंत्रणावरून...! पवारांच्या या धूर्त खेळीचे मोदी गुलाम झाले की मोदींच्या भाजपलाच पवारांची जास्त गरज आहे, याची चर्चा यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी बारामतीत काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीचपर्यंत मोदी बारामतीत असतील. तेथील शेतकरी मेळाव्यात मोदींचे जाहीर भाषण आहे. चार महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मोदींनी बारामतीत जाहीर सभा घेतली होती. त्या वेळी मोदी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात पवारांवर जोरदार टीका केली होती. बारामतीला चाचा-भतीजाच्या गुलामगिरीतून मुक्त करा, असे ते म्हणाले होते. या वेळी ते पवारांच्याच विद्या प्रतिष्ठान व कृषी विद्यालयाला भेट देतील. पवारांचे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांच्या नावाने उभारलेल्या सभागृहाचे उद‌्घाटन करणार आहेत.

पुढे वाचा, 'लंच डिप्लोमसी'