आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहल्ला समितीचे नामकरण अाता पाेलिस मित्र समिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जातीय सलाेखा वाढीस लागण्याच्या दृष्टीने माेहल्ला समित्या स्थापन करण्यात अाल्या अाहेत. शासनाने नुकताच अादेश काढून या समितीचे नामकरण ‘पाेलिस मित्र समिती’ असे केले अाहे. तसेच जिल्हा, तालुका, पाेलिस ठाणे तसेच पाेलिस अायुक्तालय क्षेत्रात शांतता समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात अाल्याचा अध्यादेशही काढण्यात अाला अाहे.
यापूर्वी स्थापन झालेल्या माेहल्ला कमिटीत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे घटक असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या सर्व समित्या बरखास्त करण्याचे अादेश दिले हाेते. अाता नवीन समिती नेमताना संबंधित व्यक्तींची पाेलिस पडताळणी झाली पाहिजे. निष्कलंक चारित्र्याच्या व्यक्तींना अाता समितीत प्राधान्य देण्यात येणार असून दखलपात्र, अदखलपात्र तक्रार,

गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला अशा समितीत स्थापन देण्यात येणार नाही.
पाेलिस िमत्र समितीच्या सदस्यांची िनवड पाेलिस ठाण्याचे प्रभारी करणार असून प्रत्येक समितीत २० ते २५ सदस्य असतील.

धार्मिक स्थळी बैठक नकाेच
शहरी भागात बिट अधिकाऱ्यांनी समितीची बैठक अाठवड्यातून एकदा, तर पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने पंधरवड्यातून एकदा घ्यावी. तसेच ग्रामीण भागात पाेलिस ठाणे, दूरक्षेत्रातील पाेलिस निरीक्षकांनी समितीची बैठक अाठवड्यातून एकदा, तर पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी पंधरवड्यातून एकदा घ्यावी. सदर बैठका पाेलिस ठाणे, धार्मिक स्थळे या ठिकाणी न घेता त्या बीट, माेहल्ला किंवा माेक्याच्या ठिकाणी घ्याव्यात, असे अादेशात नमूद केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...