आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहसीनच्या वडिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; उज्ज्वल निकमांनी खटला लढविण्याची केली मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या मोहसीन शेख हत्याप्रकरणाचा खटला प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निकम यांची भेटून त्यांना याप्रकरणाची माहिती दिली व मोहसीन यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीबाबत माहिती दिली. त्यानंतर निकम यांनी हा खटला लढविण्यास होकार कळविल्याची माहिती कळत आहे.
आज सकाळी हत्या झालेल्या मोहसीन शेख याचे वडिल सादिक शेख यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन मोहसीनच्या हत्येला जबाबदार असणा-यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली. चव्हाण यांनी सादिक शेख यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. सादिक शेख यांनी हा खटला सरकारी वकिल निकम यांच्याकडे सोपवावा अशीही मागणी केली होती. त्यानंतर चव्हाण यांनी तत्काळ निकम यांच्याशी चर्चा केली. निकम यांनीही हा खटला लढविण्यास होकार दिल्याचे कळते. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.
महापुरुषांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर आल्यानंतर हडपसर येथे तणाव निर्माण होऊन त्यात आयटी अभियंता मोहसीन सादिक शेख (वय 28, रा. सोलापूर) याची एका टोळक्याने मागील आठवड्यात हत्या केली होती. याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याला हडपसर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे. आतापर्यंत सदर प्रकरणात एकूण 20 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
कोण आहे धनंजय देसाई, वाचा पुढे....