आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधवा महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग; पुण्यातील सांगवीतील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या सांगवी हद्दीत विधवा महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेला शासकीय पेन्शन मुळवून देतो, या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग केला आहे. मधुकर शंकर शिंदे असे आरोपीचे नाव आहे.

 

सूत्रांनुसार, पिंपळे निलख येथे राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेचा मधुकर शंकर शिंदे याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. 26 नोव्हेंबरला पीडित विधवा महिलेला पेन्शनचा फॉर्म देण्याच्या बहाण्याने आरोपी शिंदे याने स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने महिलेच्या कमरेला हात लावत 'तू माझी इच्छा पूर्ण कर' असे म्हटले, कशी बशी महिला ही त्याचा तावडीतून सुटून तिने घर गाठले. महिला या प्रकारामुळे प्रचंड घशपरली होती. त्यामुळे तिने दोन दिवसनंतर सांगवी पोलिसात फिर्याद दिली.महिलेला दोन मुली आहेत.तसेच महिलेचा पती हा सतरा वर्ष्यापूर्वी मयत झाला आहे.आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...