आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनचे राज्‍यात आगमनः सलामीलाच शतक, मराठवाड्याला 6 दिवसांची प्रतिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/औरंगाबाद- नैर्ऋत्य मोसमी मान्सूनने आगेकूच कायम राखत बुधवारी राज्यात प्रवेश केला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा येथे मान्सूनचे ढग दाटले. मध्य अरबी समुद्रातही मान्सूनने मुसंडी मारली. चिपळूणमध्ये (रत्नागिरी) सलामीच्या पावसानेच शतक ठोकले. येथे 113 मि.मी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. औरंगाबादेत बुधवारी मध्यरात्री रिमझिम सरी कोसळल्या. दक्षिण महाराष्ट्रापर्यंत वेगाने मजल मारणा-या मान्सूनचा प्रवास काहीसा मंदावला. दक्षिण गोलार्धातील चक्राकार वा-यांमुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळे आले आहेत. तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सून मंदावला आहे. मात्र थोड्याच दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची आशा आहे, असे पुणे वेधशाळेच्या संचालक सुनीता देवी यांनी सांगितले. त्यामुळे राज्याच्या उर्वरित भागात मान्सून कधी पोहोचणार याबाबत पुढील दोन दिवस तरी अनिश्चितता कायम राहणार आहे.
मराठवाड्यात रिमझिम
कोकण किनारपट्टीसह मध्य व प. महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी ढगाळ वातावरण होते. मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणीत रिमझिम पाऊस झाला. आगामी 24 तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा आहे. पावसाळा सुरू झाल्याने तापमानात झपाट्याने घट होत असून, नागपुरात 43.3 अंश सेल्सिअस एवढ्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात 12 जूनला दाखल होणार
नांदेड । केरळनंतर 7 दिवसांनी मान्सून मराठवाड्यात येतो.साधारणत: 12 ते 13 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. बुधवारचा पाऊस मान्सूनपूर्व होता, अशी माहिती एमजीएम कॉलेजच्या अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक प्रा. श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
अस्मानी संकट ; वादळी पावसाचा तडाखा
मसाला आणि गाभ्रीचा पाऊस
कोकण, दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल