आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग बदलून मान्सून राज्यात; पूर्व विदर्भातून झाले आगमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पूर्व विदर्भाच्या दिशेने मान्सूनची आगेकूच सुरू असून येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्रातही वाटचाल सुरू असून ४८ तासांत कोकणमार्गे मान्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ. सुनीता देवी म्हणाल्या, अनुकूल घटकांवर मान्सूनचे आगमन अवलंबून असते. यंदा अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात अनुकूल घटक निर्माण झाल्याने पावसाच्या त्या शाखेने लवकर प्रगती केली, असे म्हणता येईल. उपसागरात ओडिशापासून ईशान्येपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्याचा परिणाम म्हणून मान्सून अधिक वेगाने राज्यात पोहोचला आहे. अरबी समुद्रातही आता मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.

दिवस मुसळधार?
आयएमडीच्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी (१९-२० जून) मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ, कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.