आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनची आगेकूच; 48 तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नैर्ऋत्य मोसमी पावसाने आगेकूच कायम ठेवली असून, राज्याच्या उर्वरित भागात प्रवेश केला. मान्सूनचे ढग कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रवर घोंगावताना दिसत आहेत.

महाराष्ट्राचा निम्मा भाग या ढगांनी व्यापला असून, अनेक भागांत शुक्रवारी पाऊस पडला. येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठवडाभरात सुमारे 19.6 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य भारतात हे प्रमाण 13.3 टक्के आहे. ईशान्येकडील राज्यांत ते 32 टक्के असून दक्षिणेकडील राज्यांत 42.1 टक्का आहे. दोन दिवसांत पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे.

गुरुवारी सायंकाळपासूनच्या 24 तासांत औरंगाबाद, परभणी, माजलगाव, निलंगा, सिन्नर, दिंडोरी, किनवट तसेच नाशिक, मालेगाव, महाबळेश्वर, सातारा, सांगलीत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.