आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मान्सून अाला, किनाऱ्यावर "आशोबा' वादळाचे सावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैऋत्य मौसमी पावसाने (मान्सून) सोमवारी तळकोकणात प्रवेश केला. केरळात येण्यासाठी पाच दिवस उशीर करणाऱ्या मान्सूनने महाराष्ट्रात येण्याचा दिवस मात्र अचूक पाळला. दरम्यान, अरबी समुद्रात "आशोबा' चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तथापि, त्याची राज्यातील मान्सूनशी टक्कर होण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी बरसणारा पूर्वमोसमी पाऊस मान्सून येत असल्याची वर्दी देत होता. सोमवारी पहाटेपासून कोकणात मान्सूनधारा बरसू लागल्या. रविवारी मध्य कर्नाटकात पोचलेल्या मान्सूनने सोमवारी संपूर्ण केरळ, उत्तर कर्नाटकाचा काही भाग वगळता संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला.आता मंगळवारी तो महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता आहे.

२४ तासांत पाऊस
येत्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात सर्वत्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढच्या दोन दिवसांत राज्यातील पाऊसमानात वाढ होण्याचा हवामानखात्याचा अंदाज आहे.महाराष्ट्रातील मान्सूनला ‘आशोबा’चा फटका नाही
{ मुंबईच्या नैऋत्येला ५९० किमीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे "आशोबा' या चक्रीवादळात रूपांतर झाले. ताशी ७० ते ९० किमी वेगाने वाहणारे वारे कर्नाटक व महाराष्ट्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
{ येत्या २४ तासांत हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. तथापि, या वादळाचा महाराष्ट्रातील पावसावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
राज्यात बीटी कापूस बियाणे मिळणार १०० रुपये स्वस्त
जळगाव | किमती कमी करण्याच्या आवाहनाला बियाणे कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने सोमवारी अधिसूचना काढून बीटी कपाशीच्या वाणाचे दर पाकिटामागे १०० रुपयांनी कमी केले. त्यामुळे बीटी २ प्रवर्गातील सर्व वाणांचे पाकीट ८३० रुपयांना मिळणार आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली. जास्त दराने विक्री केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई हाेईल. राज्यात २ कोटी बीटी पाकिटे विक्री होते.