आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून थबकला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अरबी समुद्रात ओमानच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने एक दिवस आधीच राज्यात दाखल झालेला मान्सून बुधवारी जागीच थबकला. त्यामुळे राज्यात कुठेही लक्षणीय पावसाची नोंद झाली नाही, असे हवामान खात्याने स्पष्ट केले.

अंदमान, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा काही भाग, केरळ, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूचा किनारी भाग मान्सूनने व्यापला आहे. या भागात बर्‍याच ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. मात्र, ओमानच्या दिशेने तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या देशातील पुढील प्रगतीला अडथळे आणणारे ठरले आहे. बाष्पयुक्त वारे या कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षित होत आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास मान्सूनची राज्यातील प्रगती खुंटण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या 24 तासांत परिस्थितीत बदल घडल्यास मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होईल, असा अंदाज आहे.