आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनसाठी आठ दिवसांची प्रतीक्षा; स्थिती सध्या प्रतिकूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यात पूर्वमोसमी पाऊस वेळेत दाखल झाला, मात्र बहुप्रतीक्षित मान्सूनच्या आगमनासाठी सध्या अरबी समुद्रातील परिस्थिती अनुकूल नसल्याने मान्सूनचे राज्यातील आगमन किमान आठ दिवसांनी लांबणार आहे.

याउलट बंगालच्या उपसागरातील मान्सूनच्या शाखेने आपली प्रगती कायम राखत ईशान्येकडील राज्ये तसेच उपसागरात आगेकूच केली आहे. मान्सूनच्या कारवार, गदगमधील शाखेच्या प्रगतीसाठी अनुकूल प्रणालीस(सिस्टिम्स) किमान आठ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे २० ते २२ जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा कायम राहणार आहे आणि जूनमधील पावसाचे प्रमाणही अपेक्षेपेक्षा घटण्याची शक्यता आहे.

शास्त्रज्ञ आयआयटीएममधील माजी संशोधक डाॅ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. खासगी हवामान संशोधन संस्थांनीही अधिक पावसाचे अंदाज दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...