आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळामुळे मान्सून थबकला; केरळात 3 जूनपर्यंत आगमनाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नियोजित वेळेपेक्षा आधीच अंदमानच्या सागरात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. शनिवारी मान्सूनने बंगालच्या उपसागरात थोडी आगेकूच केली. उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता घटल्याने थबकलेला मान्सून किंचित पुढे सरकला आहे. त्यामुळे मान्सून आता 3 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

मान्सूनची ही वाटचाल संथ असली तरी सध्या अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडत आहे. अनुकूल हवामानशास्त्रीय घटकांमुळे पं. बंगाल, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आदी भागांत कमी दाबाचे पट्टे सक्रिय होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून आगामी दोन दिवसांत या भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.