आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनची आगेकूच; बंगालची खाडी आणि अरबी समुद्राकडे झेपावला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मान्सूनची आगेकूच सुरू असून तो मंगळवारी बंगालची खाडी आणि अरबी समुद्राकडे झेपावला आहे. एक ते दोन दिवसात मान्सून कोकणात बरसू शकतो. दरम्यान, प्रचंड उष्णतेने होरपळणार्‍या उत्तर भारतातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान एक-दोन अंशांनी उतरले आहे. तरीही ते सामान्यापेक्षा पाच-सहा अंशांनी वाढलेले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पूर्वाेत्तर राज्ये व पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात वेगाने पुढे झेपावला आहे. यामुळे येत्या एक-दोन दिवसांत तो कर्नाटक किनारपट्टी, कोकण, गोव्यात दाखल होऊ शकतो. मात्र पूर्व-पश्चिम राजस्थान, विदर्भ, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश व हरियाणाच्या काही भागांत उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे.

अजून आठवडाभर तरी त्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.