आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थांबलेला मान्सून परत फिरला, मान्सून ६ जून रोजी केरळात आला होता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यंदाच्या ६ जूनला केरळ किना-यावर दाखल झालेला नैऋत्य मोसमी वा-यांचा (मान्सून) परतीचा प्रवास मंगळवारपासून सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थान आणि कच्छमधील मान्सूनने दिशा बदलली आहे. महाराष्ट्रात मान्सून ११ जूनला आला होता. दरवर्षी १ सप्टेंबरच्या सुमारास प. राजस्थानातील बाडमेर, बिकानेर भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा २३ दिवस उशिराने तो सुरू झाला आहे.
आगमन वेळेत पण परतीचा प्रवास विलंबाने होण्याचे चित्र गेल्या दशकभरात दिसते. २००८ मध्ये सर्वात उशिरा म्हणजे २९ सप्टेंबरला हा परतीचा प्रवास सुरू झाला होता. गतवर्षी तो ९ सप्टेंबरला राजस्थानातून परत फिरला होता.

महाराष्ट्रातून केव्हा? : महाराष्ट्रातून १ ऑक्टोबरच्या सुमारास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. १५ ऑक्टोबरपर्यंत तो राज्यातून पसार होतो. राजस्थानातून उशिरा परत फिरलेला मान्सून राज्यात कधी परत फिरतो, याकडे हवामानतज्ज्ञांचे लक्ष आहे. पावसाळा वाढल्याचा फायदा पाऊसमान वाढण्यात झाला आहे.