आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monsoon News In Marathi, Marathwada, Vidarbh, Divya Marathi, Rain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी; मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात प्रतीक्षाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वा-यांनी (मान्सून) गुरुवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात आगेकूच केली. पुढील 48 तासांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून पोहोचलेला नसल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी मराठवाड्याच्या काही भागात मात्र दमदार पाऊस झाला. हा पाऊस मान्सूनचाच असल्याचा दावा काही हवामान शास्त्रज्ञांनी केला आहे.
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले, ‘कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगणचा बराचसा भाग, आंध्रची किनारपट्टी, ओरिसा, बंगाल आणि बिहारचा उर्वरित भाग या ठिकाणीही मान्सूनची आगेकूच झाली. आता मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात मान्सून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. ईशान्य व दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. तुलनेने महाराष्ट्रातील मान्सूनव्याप्त जिल्ह्यांतील पाऊसमान नेहमीपेक्षा कमी आहे.’ गेल्या 24 तासांत राज्यात अनेक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पाऊस झाला. येत्या 24 तासांत कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पाऊस आणि ऊन
गेल्या 24 तासांत राज्यात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : पणजी - 25, हर्णे - 36, मुंबई - 7, रत्नागिरी - 6, महाबळेश्वर - 35, उस्मानाबाद - 3, रत्नागिरी - 10, मालेगाव - 17, नाशिक - 12, दिंडोरी - 10, वाशीम - 40, चंद्रपूर - 20. राज्याच्या सर्व भागातील पारा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच चाळीस अंशांच्या खाली आला आहे. राज्यातील सर्वाधिक 39.8 अंश तापमान अमरावती येथे नोंदले गेले.