आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसमी पाऊस प्रवेशद्वारापाशी थबकला, पावसाचे आगमन अजून लांबणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी मुंबईत जाेरदार पाऊस झाला. - Divya Marathi
शनिवारी मुंबईत जाेरदार पाऊस झाला.
पुणे - केरळमध्ये येताच वेगाने कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या विविध भागांत आगेकूच करणारा नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या प्रवेशद्वारापाशी थबकला अाहे. हीच स्थिती आगामी दोन-तीन दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने राज्यातील पावसाचे आगमन अजून लांबणीवर पडले आहे.

मान्सूनची उत्तरसीमा शनिवारी सायंकाळपर्यंत कारवार, गदग परिसरात होती. तेथून मान्सून पुढे सरकलेला नाही. आगामी तीन दिवस बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि उत्तर भागात तसेच ईशान्येकडील राज्यांत तो बरसण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
पुढे वाचा... राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अद्याप दोन-तीन दिवस लागतील,
बातम्या आणखी आहेत...