आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून अरबी समुद्राकडे, 48 तासांत केरळात दाखल होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सूनच्या ढगांनी मंगळवारी देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रातील आगेकूच सुरू केली. अंदमान-निकोबार, श्रीलंका व्यापून मान्सूनची केरळच्या दिशेने प्रगती सुरू आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पूरक परिस्थिती असल्याने २४ ते ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र ‘स्कायमेट’ने मान्सूनचे केरळमध्ये मंगळवारी आगमन झाल्याचे वृत्त दिले.

गुरुवारी पावसाचा अंदाज
मराठवाड्यात ९ ते ११ जून दरम्यान काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...