आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon To Be More Active In Maharastra In Next 48 Hours

विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा 48 तासांत बरसणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यभर मंगळवारपासून काहीसी विश्रांती घेतलेला पाऊस येत्या 48 तासांत पुन्हा बरसण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश बर्‍याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत नैऋत्य मोसमी पाऊस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सक्रिय राहिला. कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, महाबळेश्वर, इगतपुरी, राधानगरी, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भात नागपूर, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया आदी ठिकाणीही वरूणराजाने काहीशी हजेरी लावली.

पश्चिमेवर पाऊस मेहेरबान
पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम बंगाल व लगतच्या भागावर आहे. समुद्रसपाटीवरील मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सामान्य स्थितीच्या जवळपास आहे. मध्यप्रदेशच्या उत्तर भागात व उत्तर प्रदेशच्या दक्षिणेकडील कमी दाबाचे क्षेत्र वरील पट्ट्यात विलीन झाले आहे. समुद्रसपाटीवर दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंतचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.