आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • More Seats This Loksabha Election Get Ajiti Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाव्यासाठी प्रयत्न सुरू\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीचे प्रयत्न आतापासूनच सुरू केले आहेत. विविध सर्वेक्षणांचे अंदाज आमच्या दृष्टीने वाईट आले ते एका अर्थी चांगलेच झाले. त्यातले बारकावे लक्षात घेऊन चुका दुरुस्त करतो आहोत,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.


पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पवार यांचे स्वागत केले. सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक, तर खजिनदार सुकृत करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ६ किंवा चारच खासदार निवडून येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. याबाबत पवार म्हणाले की, ‘आम्ही दुधखुळे नाहीत. हे अंदाजच असले तरी ते खरे ठरतील, असे गृहीत धरून आम्ही सावध आहोत.’


प्रश्न : लोकसभेला ज्येष्ठांना उतरवण्याच्या चर्चेमुळे ‘राष्ट्रवादी’तले काही जण धास्तावले आहेत.
पवार : पक्षामुळे अनेक जण आमदार, मंत्री झाले. त्यामुळे उद्या पक्ष जो जबाबदारी सोपवेल ती स्वीकारावीच लागेल. पक्षाने संधी दिल्यामुळे राजकारणातले स्थान टिकून आहे हे लक्षात घेऊन पक्षाचा आदेश पाळणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते.
प्रश्न : काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागांची अदलाबदल होणार आहे का?
पवार : काही जागांच्या बाबतीत तसा विचार सुरू आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी किमान एक-एक जागा लढवावी, यावर एकमत आहे. अन्यथा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते नाराज होतील. विधानसभेच्या जागांची स्थिती लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदल होऊ शकते. परंतु, काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी 22 या मूळ जागावाटपात बदल होणार नाही.
प्रश्न : मालेगाव स्फोटाचा संदर्भ देऊन शरद पवार व्होटबँक राजकारण करताहेत ?
पवार : शरद पवारांनी संपूर्ण राजकीय कारकीर्दीत सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली. राष्ट्रवादी कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही. मालेगाव स्फोट किंवा इशरत जहाँच्या एन्काउंटरसंदर्भात बोलताना पवारांनी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्षांच्या मतावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही.
प्रश्न : माजी आमदारांनी पेन्शनवाढ करून घेतली, ती तुम्हाला रास्त वाटते?
पवार : या प्रस्तावाला वित्त विभागाने विरोध केला होता. परंतु, बहुसंख्य आमदारांनी पेन्शनवाढीस संमती दिली. कदाचित पुढच्या निवडणुकीत ‘माजी’ होण्याची भीती त्यांना वाटली असावी. परंतु, जे झाले ते योग्य झाले नाही, असे लोकांचे मत आहे. मलाही ते पटते.


मराठा आरक्षणासंदर्भात....
‘मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे यांची कमिटी नेमण्याचा निर्णय मीच घ्यायला लावला. परंतु, निर्णय घेताना तो कोर्टातही टिकला पाहिजे याकडेही लक्ष द्यायला हवे. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक जातीपातींचा विषय काढला जातो. निवडणुका झाल्यावर पुन्हा विषय थंड पडतो. शरद पवार यांनी मांडलेली भूमिकाच अधिकृत भूमिका असेल. छगन भुजबळ यांच्यावर टीका करणा-या मेटे यांनाही समज दिली आहे.’