आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Morning Walk With Marathi Literary Meet President, Sripal Sabnis, Afterr He Was Advisd 2 Go On Morning Walk By Right Wingers

श्रीपाल सबनीसांसमवेत नागरिकांचा मॉर्निंग वॉक! पुण्यात सनातनला प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध संघटनांच्या सदस्यांनी व नागरिकांनी श्रीपाल सबनीसांसमवेत मार्निंग वॉकमध्ये सहभाग घेतला. - Divya Marathi
पुण्यात आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध संघटनांच्या सदस्यांनी व नागरिकांनी श्रीपाल सबनीसांसमवेत मार्निंग वॉकमध्ये सहभाग घेतला.
पुणे- उजव्या विचारसारणीतील कट्टरवादी संघटना अशी ओळख असलेल्या सनातन संस्थेच्या धमकीनंतर पुण्यात आज #Morning walk with Sripal Sabnis फेरी काढण्यात आली. सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांनी मागील आठवड्यात ' श्रीपाल सबनीस, तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला' असे टि्वट केले होते. यानंतर पुनाळेकर व सनातन संस्थेवर सडकून टीका करण्यात आली. आपल्याला माहित असेलच की, डॉ, नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या ते सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला गेल्यानंतर झाल्या होत्या. हाच संदर्भ घेऊन पुनाळेकर यांनी सबनीस यांना धमकी दिल्याचे मानले जात होते. मात्र, पुण्यातील विविध पक्ष-संघटनानी सनातन संस्थेच्या धमकीला भीक घालत नसल्याचे सांगत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या समर्थनार्त त्यांच्या समवेत मार्निंग वॉक केला.
आज सकाळी पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल पार्टी (इंडिया), आरोग्य सेना, राष्ट्रीय सेवा दल व इतर अनेक संघटनांच्या सदस्यांनी या वॉकमध्ये सहभाग घेतला. सनातनच्या धमकीचा निषेध करत 'लोकशाही जिंदाबाद, लोकशाही की ठोकशाही' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वत: श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सबनीस म्हणाले, आपला धर्म कोणाही व्यक्तीची हत्या करण्यास सांगत नाही. सनातन संस्था ही पुनाळेकर व त्याच्या काही सहका-यांनी हायजॅक केली आहे. मी माझे विचार स्वतंत्र्य घेऊन बोललो आहे. कोणाला मान्य असेल किंवा नसेल. पण भाजपच्या नेत्यांनी व मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाला जरूर आले पाहिजे. सबनीस या व्यक्तीसाठी येऊ नका तर मराठी साहित्य स्वारसतांच्या मेळाव्याला त्यांनी उपस्थिती लावली पाहिजे. ते नाही आले तर ते माझा नव्हे सर्व साहित्यिकांचा अवमान असेल. मुख्यमंत्री विवेकशील आहेत. ते अविवेकी मार्ग स्वीकारणार नाहीत असे ते स्वच्छ, प्रमाणिक व कार्यक्रम मुख्यमंत्री असल्याचे सबनीस यांनी सांगितले. तुम्ही माझा निषेध करा, माझ्या प्रतिकात्मक पुतळ्यांची धिंड काढा, ते जाळा पण संमेलनाला या असे सांगत विचाराची लढाई विचाराने लढा व हिंसक प्रतिक्रिया सोडून सहभागी होण्याचे आवाहन भाजपवासियांना केले.
पुढे पाहा, मॉर्निंक वॉकमधील क्षणचित्रे...