आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Kills His Son With The Help Of Her Boyfriend In Pune

पुणे: अनैतिक संबंधातूनच प्रियकराच्या मदतीने उच्चशिक्षीत आईकडून मुलाची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत चैतन्य बालपांडे... - Divya Marathi
मृत चैतन्य बालपांडे...
पुणे- उच्चशिक्षीत आईने 13 वर्षाच्या मुलाला बॅटने मारहाण करून हत्या केल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अपंग असलेला मुलगा कायम घरातच राहत असल्याने अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने प्रियकर व त्याच्या दोन मित्राच्या मदतीने आईनेच मुलगा चैतन्यचा खून केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणी आई राखी तरूण बालपांडे (वय 36 ) हिला 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
चैतन्य तरूण बालपांडे (13, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. चैतन्यचा गुरुवारी रूग्णालयात मृत्यू झाला होता. चैतन्यला आई राखी, तिचा प्रियकर सुमीर सुनील मोरे (28, विश्रांतवाडी) व त्याच्या दोन मित्रांनी मारल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहेत.
याबाबत माहिती पुढे येत आहे की, राखी बालपांडे गेल्या दोन वर्षापासून विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात गेल्या दोन वर्षापासून राहत होती. या गुन्ह्यातील संशयित सुमीत मोरेच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राखी व तिची आई, तिची बहिण व मुलगा चैतन्य राहत आहेत. राखी मूळची नागपूरची असून, तिचे तिच्या नव-याशी पटत नाही. त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, दोन वर्षापूर्वी राखी पुण्यात आल्यानंतर चैतन्यला पुणे एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकले होते. गेल्या दोन वर्षापासून ती त्याचा चांगला सांभाळ करीत होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ती चैतन्यला मारहाण करायची. तसेच आता तो सातवीला गेला होता. मात्र, राखीने अचानक त्याचे शाळेत जाणे बंद केले. चैतन्य पायाने अपंग होता. त्यामुळे यापूर्वी राखी त्याची काळजी घ्यायची. मात्र मागील काही दिवसापासून त्याला घरात कोंडीत असे. त्याला उपाशी ठेवून त्याचा मानसिक छळही करीत होती.
दोन महिन्यापूर्वी राखीच्या बहिणीचे लग्न झाले व ती मुंबईला राहायला गेली. तेव्हापासून राखी आई व चैतन्यसह राहत होती. मागील आठवड्यात आईचे व राखीचे भांडण झाले. त्यामुळे आई नागपूरला आठ दिवसापूर्वी निघून गेली होती. दरम्यान, या काळात राखीच्या घरी सुमीत व त्याच्या दोन मित्राचे सारखे येणे-जाणे होते. राखी व सुमीत यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे शेजा-यांचे म्हणणे आहे. मुलगा चैतन्य आता 13 वर्षाचा म्हणजेच मोठा होऊ लागल्याने राखीला त्याची अडचण होऊ लागली. त्यातच तो अपंग असल्याने कायम घरातच राहायचा. राखी व सुमीतला चैतन्य अडसर ठरू लागला. त्यामुळे मागील आठ दिवसापासून राखीसह सुमीत व त्याचे मित्र त्याला मारहाण करीत होते अशी माहिती शेजा-यांकडून पुढे येत आहे. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
चैतन्यला सुमीत व त्याच्या मित्रानीच दवाखान्यात दाखल केले होते. त्यावेळी तो बाथरूममध्ये पडल्याचे सांगितले गेले होते. मात्र, मंगळवारी राखी व सुमीतने त्याला बॅटने मारहाण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री चैतन्यला मारहाण करून राखी ऑफिसला गेली होती. त्यानंतर ती तुळशीबागेतही खरेदी गेली होती. बुधवारी सायंकाळी सुमीत व राखी बचाव करण्यासाठी वकिलाकडे गेल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आई राखी बालपांडे, तिचा प्रियकर व घरमालक सुमीत मोरे यांनी चैतन्य याला कट करून मारल्याचे स्पष्ट होत आहे. राखी बालपांडे ही उच्चशिक्षीत असून वाकड येथे एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत आहे. चैतन्यचे वडील तरुण बालपांडे मुलाचे पार्थिव घेऊन नागपूरला घेऊन गेले असून तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
पुढे आणखी पाहा....