आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Suicide With Her Three Child Girls In Daund

दौंडमध्‍ये तीन मुलींसह मातेची आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, बारामती - दौंड येथील भीमा नदीच्या पुलावरुन नदीपात्रात उडी घेत एका मातेने आपल्या तीन मुलींसह बुधवारी पहाटे आत्महत्या केली. अफरीन मेहबुद्दीन शेख (वय 26), अर्शीदा शेख (6), असमा शेख (4) व सलीमा शेख (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अफरीनची चौथी मुलगी तस्कीना घटनास्थळावरून पळून गेल्याने ती बचावली.
अफरीनाचा पती मेहबुद्दीन ट्रक ड्रायव्हर असून तो कामानिमित्त नेहमी घराबाहेरच असतो. मागील चार महिन्यापासून तो परराज्यात गेल्याने अफरीन दौंड येथे माहेरी गेली होती.

बुधवारी पहाटेच्या सुमारास चार मुलींना घेवून ती भीमा नदीच्या पुलावर गेली. प्रथम तिने तीन मुलींना नदीत ढकलून दिले. हा प्रकार पाहून मोठी मुलगी तस्कीन घाबरून पळून गेली व तिने कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. कुटुंबिय व पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अफरीननेही आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अफरीनच्या पतीची चौकशी होणार आहे.