आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर तेरेसांना संतपद, महाराष्ट्र अंनिसचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मदर तेरेसा यांनी संतपदासाठी दुसऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना सप्टेंबर महिन्यात संतपद बहाल करण्यात येणार असल्याचे पाेप फ्रान्सिस यांनी नुकतेच जाहीर केले. हा तेरेसा यांच्या कार्याचा अपमान असून संतपद द्यायचेच असल्यास सेवाकार्यासाेबत चमत्कार केल्याचा िनकष ठेवण्याची गरज नाही. संतपदासाठी मदर तेरेसांनी दाेन चमत्कार केल्याचा दावा व्हॅटिकन सिटीचे पाेप फ्रान्सिस हे करत असल्यास त्यांनी सदर चमत्कारांचे दावे सिद्ध करावेत, असे अाव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा िनर्मूलन समितीतर्फे (अंनिस) देण्यात आले आहे. दरम्यान, जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रस्तरीय जात पंचायतविराेधी कायदा मागणी परिषद २० मार्च राेजी पुण्यात अंनिसतर्फे अायाेजित करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...