आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पाेलिस अायुक्तालय उंदरांच्या त्रासाने हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चाेरटे, भामटे, दराेडेखाेरांपासून नागरिकांचे संरक्षण करून कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी पाेलिसांवर असते. वाढत्या गुन्हेगारीमुळे पाेलिसांचा कामाचा ताण वाढत अाहे. त्यातच अाता सायबर क्राइमसारखे हायटेक गुन्हे वाढत असल्यामुळे त्याला अाळा घालण्यासाठी पाेलिस ठाणे, अायुक्तालयाच्या डिजिटलायझेशनवर भर दिला जात अाहे. मात्र, पुणे पाेलिस अायुक्तालयातील संगणक जाेडणीकरिता वापरण्यात येत असलेल्या लॅन वायरिंग (इंट्रानेट) सातत्याने उंदीर कुरतडत राहिल्याने वरिष्ठ अधिकारी व तंत्रज्ञही हैराण झाले अाहेत.     
पुणे पाेलिस अायुक्तालय अंतर्गत सर्व पाेलिस ठाणे, वरिष्ठ अधिकारी कार्यालय व दाेन प्रशिक्षण केंद्रांकरिता सीसीटीएनएस कार्यप्रणालीकरिता संगणक जाेडणी करण्यात अाली अाहे, परंतु लॅन वायरिंग पुरवठा करणाऱ्या बहुतांश वायर उंदरांनी कुरतडल्यामुळे त्या खराब झाल्या अाहेत. परिणामी इंट्रानेट सेवा खंडित झाल्याने काही कार्यालयांतील बीएसएनएल माेडेम नादुरुस्त झाली अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...