आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकरांचे मूळ गाव दत्तक घेणार : खासदार साबळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोकणातील मूळ गाव आंबवडे दत्तक घेऊन त्याचा विकास करणार असल्याची घोषणा भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी गुरुवारी केली. आपल्या खासदार निधीतून नागपूर येथील डॉ. आंबेडकर यांच्या वस्तुसंग्रहालयासाठी ५० लाख निधी देणार, असेही साबळे म्हणाले.

आंबवडे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. या गावाच्या नावावरूनच बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबवडेकर असे पडले होते. शालेय जीवनात डॉ. आंबेडकर यांच्यावर विशेष माया करणार्‍या शिक्षकांनी त्यांचे नाव बदलून ते आंबेडकर असे केल्याची नोंद मिळते. नागपूर येथे डॉ. बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयाचे काम सुरू आहे. त्यासाठी माझ्या खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी मी देणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. एचए (हिंदुस्तान अंटिबायोटिक्स) कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत २२ झोपडपट्ट्यांमध्ये २५ हजार स्वच्छतागृहे उभारणार आहे, असेही ते म्हणाले.