आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार बारणेंच्या राजीनाम्याची अफवा; पाेलिसात तक्रार दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राजीनामा दिल्याची अफवा साेशल मीडियातून पसरवण्यात अाली हाेती. याप्रकरणी बारणे यांच्या वतीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात अाली असून वाकडचे पाेलिस याबाबत पुढील तपास करत अाहेत. खासदार बारणे यांनी राजीनामा िदल्याची अफवा साेमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विविध व्हाॅट्सअॅप ग्रुपवर फिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच ती राज्यभर पसरली व बारणे यांना शेकडाे फाेन येऊन राजीनाम्याबाबत खातरजमा केली जाऊ लागली. बारणे यांनी मात्र राजीनाम्याचे खंडन केले.
‘माझे राजकीय विराेधक माझी बदनामी करण्याच्या हेतूने साेशल मीडियाच्या माध्यमातून मी राजीनामा िदल्याचा अपप्रचार करीत अाहेत. शिवसेनेने माझी जात न पाहता मला लाेकसभेत काम करण्याची संधी िदली अाहे. काेपर्डी येथे झालेला बलात्कार तसेच राज्यभरातील मराठा समाजावर हाेत असलेल्या अन्यायाविरुद्ध मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मूकमाेर्चांना माझाही जाहीर पाठिंबा अाहे. माझ्याविराेधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी घाबरत नाही,’ अशी प्रतिक्रिया बारणेंनी दिली.
बातम्या आणखी आहेत...