आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात भारत फोर्ज गुंतवणार 400 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एकेकाळी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे नंदनवन होता. पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे सध्या गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. एवढेच नव्हे, तर येथील काही उद्योग इतर राज्यांत गुंतवणूक करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योजकांना मध्य प्रदेशातील गुंतवणुकीसाठी निमंत्रित करण्यास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान राज्याच्या दौºयावर आले आहेत. पुण्यातील उद्योगपती, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या बुधवारी त्यांनी भेटी घेतल्या. प्राथमिक चर्चेतच भारत फोर्जने मध्य प्रदेशात 400 कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. लवकरच ते जागा पाहण्यासाठी येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री चौहान यांनी दिली.
‘‘मध्य प्रदेशातील औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी येत्या 2८-30 ऑक्टोबरला इंदूर येथे जागतिक गुंतवणूक परिषद आयोजित केली आहे. यात जगभरातील दोन हजार उद्योजक सहभागी होतील,’’ असे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे उद्योग व वाणिज्य मंत्री कैलाश विजयवर्गीय या वेळी उपस्थित होते.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि फोर्स मोटर्सचे डॉ. अभय फिरोदिया, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संजय किर्लोस्कर, भारत फोर्जचे उपाध्यक्ष अमित कल्याणी, जॉन डिअरचे रणजित नायर, सुझलॉनचे तुलसी तंती, केबीके ग्रुपचे विनय कोठारी, कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, कोअर ग्रुपचे अध्यक्ष सुधीर मेहता तसेच ‘सिम्बायोसिस’च्या संचालिका विद्या येरवडेकर, स्वाती मुजुमदार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे विकास काकतकर, डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाचे अजिंक्य पाटील आदींनी चौहान यांची भेट घेतली. चौहान व त्यांच्यासोबत आलेले दहा अधिकाºयांचे शिष्टमंडळ गुरुवारी मुंबईतील उद्योगपतींची भेट घेणार आहेत.
उद्योग-व्यवसायासाठी मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचा विचार यापूर्वी कोणी करत नव्हते. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात राज्यात ८4 हजार कोटींचे उत्पादन झाले, तर 1 लाख 10 हजार कोटींची गुंतवणूक प्रगतिपथावर आहे. जमीन व इतर बाबींच्या पूर्ततेसाठी 1 लाख 40 हजार कोटींच्या प्रस्तावांवर काम सुरू आहे, अशी माहिती चौहान यांनी दिली. इंदूर आयटी हब म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस येत असल्याचे ते म्हणाले.
मध्य प्रदेशात गुंतवणूक का?
सोयाबीन उत्पादनात देशात क्रमांक एकवर आणि गहू उत्पादनात दुस-या क्रमांकावर असल्याने प्रक्रिया उद्योगांना वाव.
औद्योगिक विकास दर ८ टक्के, कृषी विकास दर 1८ टक्के आणि सकल विकासदराचा वेग 11.९ टक्क्यांवर गेल्याने कुशल मनुष्यबळाच्या गरजेत वाढ; त्यामुळे शैक्षणिक संस्थांना वाढती संधी.
उद्योगांच्या जलद उभारणीसाठी एक खिडकी योजना.
उद्योगांना चोवीस तास वीजपुरवठ्याचे धोरण. सन 2014 पर्यंत मध्य प्रदेश होणार भारनियमनमुक्त.
वीस हजार हेक्टर क्षेत्र औद्योगिक विकासासाठी राखीव.
उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देण्याचे सरकारचे धोरण.
भौगोलिक स्थान, वाहतुकीचे जाळे लक्षात घेता वाहन उद्योग, अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजकांना अनुकूल.
हा माझा मोठा सन्मान : शिवराजसिंह चौहान
उद्योजकांच्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मराठा चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालण्यात आली. या पगडीचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री चौहान यांनी आपल्या भाषणात केला. पुणेरी पगडी हा माझा सर्वोच्च् सन्मान आहे, असे मी समजतो कारण ‘पगडी पेहनाना ये बडी सम्मान की बात मानी जाती है’, असे ते म्हणाले. पगडी घालण्यामागे एक परंपरा, गौरव आणि आदर आहे. पगडी हे त्याचे प्रतीक आहे. त्यामुळे पुणेरी पगडीने माझा मोठाच सन्मान झाला आहे, असे चौहान यांनी सांगितले.
उद्योजक व गुंतवणूकदारांना पायघड्या : \'एमपी\'चे मुख्यमंत्री चौहान यांच्या पुण्यात गाठीभेटी