आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुती टिकविण्यासाठी राजू शेट्टींचा नवा फॉर्म्यूला; सेना- भाजपची ना कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जागावाटपाचा तिढा लवकर सुटावा व लवकरात लवकर जनतेसमोर जाता यावे यासाठी राजू शेट्टींनी मध्यस्थी करीत महायुतीसाठी नवा फॉर्म्यूला मांडला आहे. शिवसेनेने 150 जागा, भाजपने 120 जागा व इतर घटकपक्षांना 18 जागा सोडाव्यात असा प्रस्ताव शेट्टींनी भाजपसह उद्धव ठाकरेंना दिला आहे. मात्र, शिवसेनेसह भाजपनेही यावर काहीही उत्तर दिलेले नसल्याचे शेट्टींनी सांगितले.
शिवसेना-भाजप व इतर चार छोट्या घटकपक्षांच्या महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. राज्यातील लोकांना परिवर्तन हवे आहे. मात्र, शिवसेना- भाजपचा सत्तेसाठीचा संघर्ष टोकाला गेल्याने घटक पक्ष अस्वस्थ आहेत. महायुतीला सत्तेचा घास कसा गिळावा याचे भान राहिले नसल्याची हतबलता खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी महायुतीतील घटकपक्ष ज्या पद्धतीने परिपक्व व समजुतीची भूमिका घेत आहेत त्यावरून शिवसेना व भाजपचे नेते कोणताही बोध घेत नाहीत. राजू शेट्टी व महादेव जानकर यांचा खरा विरोध राष्ट्रवादीला आहे. तसेच हे दोन्ही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील आहे. राष्ट्रवादीचे नेते किती तगडे आहेत व त्यांना पराभूत सर्व ताकद एकवटली तरच त्यांचा पराभव करणे शक्य असल्याची जाणीव शेट्टी-जानकर यांना आहे. मात्र भाजप मोदी लाटेवर स्वार असून, त्यांच्या जीवावर निवडून येऊ असा आत्मविश्वास नेत्यांना आहे.
मोदींना लोकसभेसाठी लोकांनी मतदान केले होते. विधानसभेसाठी भाजपकडे एकही अनुभवी नेता नसताना मोदींकडे पाहून राज्यातील लोक पक्षाला मतदान करणार नाहीत याची जाणीवच न होणे हे भाजपचे अपरिपक्व राजकारणाचे लक्षण असल्याचे दिसून येत आहे. याची जाणीव छोट्या पक्षांना असल्याने महायुती अभेद्य असेल तरच विजयश्री खेचून आणता येईल म्हणून राजू शेट्टींनी कमी पडत असतील आमच्या जागा घ्या असे सांगत दोन्ही मोठ्या पक्षांना नवा फॉर्म्यूल्यानुसार जागा वाटप करावे असा सल्ला दिला आहे. तो शिवसेना-भाजपच्या नेत्यांना किती पचनी पडतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.