आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी \'FRP\' सूत्रात गडबड केल्याने ऊस शेतकर्‍यांना मोठा फटका- राजू शेट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला दर मिळाला पाहिजे याची मागणी केली असली तरी त्यांचे शेतक-यांवरील प्रेम खोटे आहे अशी घाणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पवार केंद्रात कृषिमंत्री असताना ऊसाची किमान आधारभूत किंमत ठरविणारे एफ. आर. पी.चे 8.5 टक्केचे सूत्र 9.5 टक्के केल्याने शेतक-यांना टनामागे 250 रूपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे सध्या व भविष्यातही मोठे नुकसान होणार असून, कोट्यावधीचा फटका बसणार आहे. मग शरद पवारांचे शेतक-यांवरील हेच खरे प्रेम का असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला.
राजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादनात नवनवीन संशोधने व्हावीत, उत्पादनात वाढ होण्याकामी शेतक-यांचे दूरदृष्टी असलेले नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. सरकारच्या मदतीने ऊस शेतक-यांसाठी त्यांनी वसंतदादा शूगर इन्स्टिट्युटची स्थापना केली. वसंतदादांनी या संस्थेची उभारणी सार्वजनिक ट्रस्टच्या आधारे केली होती. त्यामुळेच या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री व सचिव साखर आयुक्त असे स्वरूप होते. याचबरोबर राज्य साखर संघाचे प्रतिनिधी या संस्थेचे संचालक होते. मात्र, पवारांनी सार्वजनिक ट्रस्टचे स्वरूप मोडून काढले. पवारांनी घटनेत बदल करून स्वत:ला या संस्थेचे तहहयात अध्यक्ष म्हणून नेमणूक करून घेतली असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे आज सरकार कोणाचेही असले तरी पवार ठरवतील तीच दिशा या संस्थेची आहे. साखर कारखानेही आताही पवारांच्या बगलबच्च्यांच्याच ताब्यात असून, सरकार उलथून टाकल्याने या साखर सम्राटांच्या माध्यमातून पवार शेतक-यांची पिळवणूक करीत आहेत. मग पवार शेतक-यांचे खरे मित्र की खोटे हे ज्याने त्याने ठरवावे असा टोलाही शेटटी यांनी हाणला.