आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'त्या\' उंदरांना घ्याल तर महायुतीचेही जहाज बुडेल- राजू शेट्टींचा भाजप-सेनेला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महायुतीच्या नेत्यांचे संग्रहित छायाचित्र)
पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांमुळेच त्यांचे जहाज बुडू लागले आहे. त्याच नेत्यांना भाजप-शिवसेना घेणार असेल तर महायुतीचे जहाजही बुडायला वेळ लागणार नाही अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. याचबरोबर आघाडीतून बाहेर पडणा-या नेत्यांना सरसकट महायुतीत घेऊ नका, असा सावधानतेचा इशारा दिला.
पुण्यात काल महायुतीची बैठक झाली. यात राजू शेट्टींसह त्यांच्या पक्षाचे नेते सदाभाऊ खोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते दिवाकर रावते, विनायक मेटे आदी सहभागी झाले होते. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून आघाडीचे काही आमदार व नेते भाजप-शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले गेले.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे जहाज बुडणार आहे. या पक्षातील नेत्यांनीच या जहाजाला बोके पाडली. आता हेच उंदीर जर भाजप-शिवसेनेत येणार असतील ते महायुतीचे जहाज बुडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आपलेच जहाज बुडणार नाही याची काळजी घ्यावी असा राजू शेट्टींनी सल्ला दिला. दरम्यान, 30 ऑगस्टपूर्वी जागावाटपाचा तिढा भाजप-सेनेने सोडवावा अशी मागणी केली.