आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळेंचे पुण्यात ‘सेल्फी विथ खड्डे’ अभियान; खड्डे दाखवा, हजार रुपये मिळवा....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील बहुतांश शहरातील रस्ते खड्डेमय असल्यामुळे सरकारवर टीकेची झाेड उठली अाहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश रस्ते खड्डेमुक्त करण्याची घाेषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी विराेधकांना मात्र त्यावर विश्वास नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी ‘सेल्फी विथ खड्डे’ हे अभियान राबवले. त्यांनी स्वत: पुण्यातल्या कात्रज-उंड्री बायपासवर जाऊन खड्ड्यांसोबत सेल्फी काढले. त्यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनीही साेशल मीडियावर हे अभियान राबवून फाेटाे पाेस्ट केले व सरकारविराेधी संताप व्यक्त केला.
 
खड्डे दाखवा, हजार रुपये मिळवा....  
‘पुण्यातला कात्रज -उंड्री बायपास व बोपदेव घाट परिसर..  राज्यातला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत.   खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? सर्वत्र हेच चित्र असताना मंत्री चंद्रकांत पाटील मात्र ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ असे आवाहन करत आहेत. ‘चला तर मग, त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया..  खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया. मी सुरुवात केली आहे, तुम्ही करताय ना?,’ असे अावाहन सुप्रिया सुळे यांनी साेशल मीडियावर केले हाेेते, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... खासदार सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डे'
बातम्या आणखी आहेत...